Tuesday, September 28, 2010


एकदा एका झाडाची जगण्याची जिद्द
मी पहिली होती…….
खरं तर……………
“आता ते नकोच इथे ” म्हणुन
लोकांनी शिव्यांची लाखोली वाहिली होती……..

त्याच्या सावलीत सुख दु:ख हलके करणारेच
त्याच्या जीवावर उठले होते…..
जीवापाड प्रेम करणारे ही
आज त्याच्या पासून दूर हटले होते………

त्याच्याच तर साथीने
हे पान न् पान वाढले होते……
आज का लोकांनी त्याला असे
मरणाच्या दारात ओढले होते …….

सर्वांना आनंद देण्यासाठी
अनेक ऊन-पाऊस त्याने झेलले होते ………
स्वत:चे दु:ख कमी होते की काय
म्हणुन वेलींचेही भार त्याने पेलले होते……..

वाटसरूंना आपल्या प्रेमाची,मायेची
उब त्याने दिली होती ………..
पण…….
गारव्याला बसणा-यांकडूनच
स्वत:ची कुचंबणा त्याने आज ऐकली होती…….

आता मात्र खरोखर हतबल ते…………

जगण्याची जिद्द्च मेली होती .............
कोणी म्हणे….
त्याच्या मुळानाच इजा केली होती…….
SUVARNA B........16/11/2009

Sunday, April 13, 2008

काहीच नाही नेता आले.......म्हणुन कविताच चोरून नेली !!!!!

माझ्या मनातले भाव मी
orkut वर post केले.....
पण लोक इतके विचित्र
"बिचा-यांनी" तेही पळवुन नेले.......

आज एक कविता.... उद्या दुसरी
म्हणता म्हणता सगळयाच नेल्या ......
माझ्या कविता मग
हळु-हळु मलाच परक्या झाल्या.........

जाब विचारायला गेले मी त्यांना
"माझ्या भावनेची का चोरी केलीत???"
म्हणे,"माझ्या life मध्ये घडलंय अगदी अस्संच,
म्हणुन तुझी कविता copy-paste केली."

माझ्या मनातल्या वादळांची
लोकांनी अशी भांडवलं केली .....
काहीच नाही नेता आले
म्हणुन कविताच चोरून नेली........
.....................................सुवर्णा बडवे.

Thursday, March 27, 2008

माझी चारोळी .....


प्रत्येक पावलावर ठेचकाळणं
सवयीचं होउन बसलंय,
आयुष्य पुढे जातंय,
पण मनच माझं खचलंय .....


प्रेम केले जरी तुझ्यावर
मनी तुझ्या रुतलेच नाही
हरताना तोल गेला
हाय........तरी तुला पट्लेच नाही......

सुख असे दे मला


सुख असे दे मला
दु:खाचा लवलेश ही नसलेले,
सुख असे दे मला
दु:खही सुखात असलेले,
सुख असे दे मला
विषही अमृत झालेले,
सुख असे दे मला
अमावस्येतही चन्द्र असलेले,
सुख असे दे मला
सूर्य किरणानाही थिजवेल
नयनातील अश्रुंनाही हसवेल.......
..............................सुवर्णा बडवे.

Tuesday, March 25, 2008

............प्रेम.........


प्रेम असते ताकावरचं लोणी,
समजावून घेणारं असावं लागतं कोणी,
प्रेम असते दुधावरची नाजुक साय,
मिळालं नाही की म्हणतात...
आपलं च नशीब दुसरं काय??
"प्रेम पहावं एकदा करून", म्हणतात सगळे,
पण तेच असतात त्यापासून वेगळे,
प्रेम या शब्दांत असते जितकी मिठास;
तितकीच असते कटुता,
म्हणुनच लिहिल्या जातात ना,
प्रेमभंगाच्या कविता............
......................Suvarna B

..............कधीतरी............


कधीतरी मग मी तुला आठवेल,
पण;तेव्हा वेळ निघून गेलेली असेल,
ना मी असेल ना माझी साथ ,
जेव्हा कोणाचाच नसेल तुझ्या हातात हात,
अश्रु दाटतील डोळयांत,
एकटाच राहशील सोहळयांत,
जेव्हा सगळे जग तुझ्यावर हसेल,
तेव्हा दव बिंदुसारखी ही आठवण,
तुला मोत्यासारखी भासेल,
जप नक्की जमले तर, ही आठवण...
हीच असेल तुझ्या आयुष्यातली एक साठवण....
............................Suvarna B

तुम्हीच सांगा मित्रानो.......

तुम्हीच सांगा मित्रानो,
तुम्हीच सांगा मित्रानो,
प्रेम इतकं स्वस्त आहे ????????

पाहता क्षणी ' तू आवडली ' म्हणाला,
इतक्या सगळ्यां मधून'तुलाच निवडली'म्हणाला,
त्याच्या हिरोपणाला म्हणे सध्या भाव जास्त आहे ......
तुम्हीच सांगा मित्रानो,

' आता तर आपण तुझ्या प्रेमात पडलो बुवा ',
' रोज आवाज ऐकायला तुझा फ़ोन नंबर हवा ',
नंबर मागण्याची त्याची स्टाइल तर अगदी मस्त आहे .....
तुम्हीच सांगा मित्रानो,

नंतर म्हणे ' मला तुझ्याशिवाय कोणीच नाही ',
एकदा भांडलो कडाक्याचे .....
तर म्हणतो कसा ' तू नहीं तो और सही ',
आता असं ऐकलंय.......
सध्या मुली शोधण्यात तो फार व्यस्त आहे..........

आता तुम्हीच सांगा मित्रानो,
प्रेम ख़रंच का इतकं स्वस्त आहे ???????
......................................Suvarna B