Tuesday, September 28, 2010


एकदा एका झाडाची जगण्याची जिद्द
मी पहिली होती…….
खरं तर……………
“आता ते नकोच इथे ” म्हणुन
लोकांनी शिव्यांची लाखोली वाहिली होती……..

त्याच्या सावलीत सुख दु:ख हलके करणारेच
त्याच्या जीवावर उठले होते…..
जीवापाड प्रेम करणारे ही
आज त्याच्या पासून दूर हटले होते………

त्याच्याच तर साथीने
हे पान न् पान वाढले होते……
आज का लोकांनी त्याला असे
मरणाच्या दारात ओढले होते …….

सर्वांना आनंद देण्यासाठी
अनेक ऊन-पाऊस त्याने झेलले होते ………
स्वत:चे दु:ख कमी होते की काय
म्हणुन वेलींचेही भार त्याने पेलले होते……..

वाटसरूंना आपल्या प्रेमाची,मायेची
उब त्याने दिली होती ………..
पण…….
गारव्याला बसणा-यांकडूनच
स्वत:ची कुचंबणा त्याने आज ऐकली होती…….

आता मात्र खरोखर हतबल ते…………

जगण्याची जिद्द्च मेली होती .............
कोणी म्हणे….
त्याच्या मुळानाच इजा केली होती…….
SUVARNA B........16/11/2009

No comments: