तुझं माझ्यावरचं प्रेम तर नाही ना कमी झालंय ???????
आठवतं तुला.........
पूर्वी माझ्याशी बोलण्यातच तुझा दिवस सुरु व्हायचा....
रात्री देखील बोलण्यातच तो संपायचा...
आता मात्र दिवसेंदिवस आपल्याला बोलणं महाग झालंय...
कारण आता काम म्हणजे तुझं सारं जग झालंय...
मला सांग.......
तुझं माझ्यावरचं प्रेम तर नाही ना कमी झालंय ????????
आठवतं तुला.........
पूर्वी कितीही कामात असला तरी तुला माझी आठवण होती...
आपल्या बहरत आलेल्या प्रेमाची ती एक साठवण होती ....
आता मात्र तुला नुसतं आठवणं आयुष्याचा भाग झालंय....
कारण आता काम म्हणजे तुझं सारं जग झालंय....
मला सांग.......
तुझं माझ्यावरचं प्रेम तर नाही ना कमी झालंय ????????
आठवतं तुला.........
पूर्वी तुझं माझ्याशी वागणं किती छान असायचं ....
फ़ोन चं कितीही बील आलं तरी तुला त्याचं भान नसायचं...
आता मात्र तुझं बोलणं देखील जरा रग झालंय....
कारण आता काम म्हणजे तुझं सारं जग झालंय....
मला सांग.......
तुझं माझ्यावरचं प्रेम तर नाही ना कमी झालंय ????????
आठवतं तुला.........
पूर्वी तुझं माझं असणं किती छान होतं ....
अस्तित्वाचं भान असुनही स्वप्नात हिरवं रान होतं....
आता मात्र हे स्वप्न देखील उजाड़ बाग़ झालंय....
कारण आता काम म्हणजे तुझं सारं जग झालंय.....
मला सांग.......
तुझं माझ्यावरचं प्रेम तर नाही ना कमी झालंय ????????
..............................................Suvarna B
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
Sehi aahe Kavita
Post a Comment